Weather Update | हवामान खात्याने दिली मान्सूनबद्दल मोठी अपडेट! जाणून घ्या

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षी मान्सून (Monsoon) उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. पण याबाबत आता दिलासादायक एक बातमी समोर आली आहे. भारतामध्ये मान्सून 2023 वेळेवर दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कारण देशामध्ये मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Meteorological department has given a big update about monsoon

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), 19 मे रोजी नैऋत्य मान्सूनने अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात हजेरी लावली होती. मात्र, त्यामध्ये काहीही बदल झालं नसल्याचं सांगितलं गेलं होतं. परंतु, हिंदी महासागराच्या वायव्यकडील क्रॉस इक्वेटोरियल प्रवाह मजबूत होणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात अंदमान-निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे.

दरम्यान, दक्षिण अरबी समुद्रात मान्सून प्रस्थापित होण्यासाठी अजून एक आठवडा लागणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 4 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होईल. केरळमध्ये (Weather Update) मान्सून दाखल होण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढील 24 तासात बंगालच्या उपसागराचा दक्षिण पट्टा, आणि अंदमान निकोबार बेट समूहाच्या काही भागांमध्ये दक्षिण पश्चिम वारे पुढे सरकण्याची पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या (Weather Update) वाटचालीला वेग मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.