NCP Leader | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राच्या राजकरणामध्ये अनेक खळबळजनक प्रकरण घडत असतात. यामध्ये महाविकास आघाडी जागा वाटपावरून संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेली ईडीची नोटीस देखील चर्चेत आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना एका नेत्यानं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Controversial statement about NCP leader
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) राजकीय दृष्ट्या कमकुवत आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय दृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जयंत पाटील यांचं नाव आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर तुम्हाला अटक करू, असा अल्टिमेट जयंत पाटलांना दिला तर ते भाजपमध्ये जायला कधीही तयार होतील.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडी नेहमी एकत्र असणार. हे विधान करून जे गुमराह केलं जातं आहे, त्याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं पाहिजे.” काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (NCP) डावपेचांपासून सावध रहा, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर (Nana Patole) टीकास्त्र चालवलं आहे. ते म्हणाले, “नाना पटोले सध्या एखाद्या इंग्रजी चित्रपटाप्रमाणे झाले आहे. हॉट अँड ब्लो. कधी गरम हवा तर कधी फुस.” “सध्या ईडीच्या कारवाईमध्ये राजकीय दबाव कोणावर असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आहे,” असही ते यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट
- Sadabhau Khot | शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन! सदाभाऊ खोत यांचा मोर्चा पुणे-बेंगलोर हायवेवर
- Monsoon Update | शेतकऱ्यांसाठी आनदांची बातमी, पावसाचा अचूक अंदाज येणार हाती; जाणुन घ्या पूर्ण माहिती
- HSC Result | 12 वीच्या पेपरची फोटोकॉपी किंवा रिचेक करायचा आहे? तर ‘या’ पद्धतीने करा अर्ज
- Devendra Fadnavis | सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकत नाही- देवेंद्र फडणवीस