Fennel And Coriander Powder | कोमट पाण्यासोबत बडीशेप आणि धने पावडरचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Fennel And Coriander Powder | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय स्वयंपाकघरामध्ये धने आणि बडीशेप सहज उपलब्ध असतात. या दोन्ही घटकांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात. बडीशेपमध्ये विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन इत्यादी घटक आढळून येतात. तर धन्यामध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बडीशेप आणि धने पावडरचे कोमट पाण्यामध्ये मिसळून सेवन करू शकतात. नियमित या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Fennel And Coriander Powder Benefits)

बडीशेप आणि धने पावडरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी कोमट पाण्यामध्ये बडीशेप आणि धने पावडरचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. या पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता, गॅस, ऍसिडिटी, पोट दुखी आणि जुलाब यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Fennel And Coriander Powder Benefits)

बडीशेप आणि धने पावडर या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात. अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करतात. बडीशेप आणि धने पावडरचे एकत्र सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Fennel And Coriander Powder Benefits)

बडीशेप आणि धने पावडरमध्ये अँटिइफ्लिमेंटरी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म हाडे आणि सांधेदुखीच्या समस्यांवर मात करू शकतात. बडीशेप आणि धने पावडरमध्ये कॅल्शियम देखील आढळून येते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. कोमट पाण्यामध्ये बडीशेप आणि धने पावडर मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो.

कोमट पाण्यामध्ये बडीशेप आणि हळद पावडर मिसळून प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात पुढील पेयांचा समावेश करू शकतात.

जिरे लिंबू पाणी (Cumin lemon water-For Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये हायड्रेट आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबू सर्वोत्तम मानले जाते. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर मिसळून घ्यावी लागेल. दररोज सकाळी या पेयाचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते.

ताक (Buttermilk-For Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ताक तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन केल्याने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर शरीरही थंड राहते. नियमित ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

नारळ पाणी (Coconut water-For Weight Loss)

नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. नारळ पाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आढळून येते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी एक उत्तम उपाय ठरू शकतो. नारळ पाणी प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button