Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक जिम आणि डाएट फॉलो करतात. मात्र, अनेकदा या गोष्टी करूनही वजन कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकतात. ही पेय प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील पेयांचा समावेश करू शकतात.

जिरे लिंबू पाणी (Cumin lemon water-For Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये हायड्रेट आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबू सर्वोत्तम मानले जाते. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर मिसळून घ्यावी लागेल. दररोज सकाळी या पेयाचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते.

ताक (Buttermilk-For Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ताक तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन केल्याने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर शरीरही थंड राहते. नियमित ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

नारळ पाणी (Coconut water-For Weight Loss)

नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. नारळ पाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आढळून येते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी एक उत्तम उपाय ठरू शकतो. नारळ पाणी प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर आल्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला खालील अनोखे फायदे मिळू शकतात.

इम्युनिटी वाढते (Increases immunity-Ginger Water Benefits)

रात्रभर आले पाण्यात भिजवून ठेवून, सकाळी त्या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. आल्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर निरोगी राहते.

पचन संस्था निरोगी राहते (The digestive system remains healthy-Ginger Water Benefits)

आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होऊ शकते. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने पोटातील जळजळ, अपचन, गॅस, मळमळ, ऍसिडिटी यासारख्या समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने अन्नपचनास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for skin-Ginger Water Benefits)

त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आल्याचे पाणी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने त्वचेवरील चमक वाढू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.