Honey Benefits | उन्हाळ्यामध्ये करा मधाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Honey Benefits | टीम महाराष्ट्र देशा: मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यामध्ये मधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. मधामध्ये विटामिन बी, कॅल्शियम, आयरन, जस्त, कॉपर इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइम्प्लिमेंटरी, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टरियल गुणधर्म देखील आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health care) घेण्यास मदत करतात. याशिवाय मध कार्बोहायड्रेटचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मधाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

उष्माघातापासून संरक्षण (Protection against heatstroke-Honey Benefits)

उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे बहुतांश लोकांना उष्माघाताच्या समस्येला सामोरे जावे लागते. उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकतात. मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे उष्माघातापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे या गरम वातावरणात उष्माघात आणि त्याची लक्षणे टाळण्यासाठी तुम्ही नियमित मधाचे सेवन करू शकतात.

शरीराला ऊर्जा मिळते (The body gets energy-Honey Benefits)

मधामध्ये कार्बोहायड्रेट आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी कार्बोहायड्रेट खूप मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये येणारा थकवा आणि आळस दूर करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्यात किंवा इतर पेयामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. दोन चमचे मधापेक्षा जास्त मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Honey Benefits)

या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर मधाचे सेवन करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. या मिश्रणाचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

उन्हाळ्यामध्ये मधाचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला खालील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

वजन वाढते (Weight increases-Mango Side-effects)

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन नियंत्रणात ठेवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मर्यादेमध्ये आंब्याचे सेवन केले पाहिजे. आंब्याचे अति प्रमाणात सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते.

साखरेची पातळी वाढते (Sugar levels rise-Mango Side-effects)

तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्ही आंब्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर आढळून येते, जी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असेल तर तुम्ही नियंत्रणात आंब्याचे सेवन करावे आणि शुगर टेस्टही नियमित करावी.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या