Share

Ajit Pawar | सरकारला कुणी रोखलं? ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अजित पवार भाजपामध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष पवारांकडे होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना पवारांनी शिंदे सरकारवर सडकावून टीका केली आहे.

शासनाच्या वतीने नवी मुंबईतल्या खारघर परिसरात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेवर अजित पवार संतापले आहे.

माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, “महाराष्ट्र भूषण या पुरस्कार सोहळ्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. या कार्यक्रमानंतर 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. या पुरस्कार सोहळ्यात मंडप टाकण्यासाठी सरकारला कुणी रोखलं होतं का? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, “पक्षाबद्दल आणि आमच्याबद्दल ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहे, त्या फक्त लक्ष विचलित करण्यासाठी केल्या जात आहे.” “मी आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाही. मुंबईत आलेले 40 आमदार मला भेटायला आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका” असे देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now