Ajit Pawar | जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत – अजित पवार

Ajit Pawar | मुंबई: सध्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीने आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच खळबळ रंगली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्याकडे लागलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत – अजित पवार (Will stay in NCP as long as there is life-Ajit Pawar)

सोशल मीडियावरून राष्ट्रवादी पक्षाचा फोटो हटवल्यानंतर पवार भाजपामध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये पूर्णविराम दिला. पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “शरद पवारांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. पक्षामध्ये आजपर्यंत अनेक चढउतार आले. मात्र, पक्षाबद्दल आणि आमच्याबद्दल जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहे. जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार आहे.” मी राष्ट्रवादीतच राहणार आहे, हे अ‍ॅफिडेव्हिटवर लिहून देऊ का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना पवार म्हणाले, “महत्त्वाच्या प्रश्नांवर दुसरीकडे लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.” बेकारी, अवकाळी पाऊस, महागाई इत्यादी गोष्टींवर सरकारने लक्ष द्यावे, असं देखील पवार या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटर वॉलपेपरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचा फोटो होता. पवारांनी हा फोटो डिलीट केल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क आणि वितर्क लावले जात आहे. अजित पवार भाजपसोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशा चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला आहे.

महत्वाच्या बातम्या