Share

Weather Update | ‘या’ ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर कुठे उन्हाची तीव्रता (Heat Wave) वाढत चालली आहे. त्याचबरोबर काही भागांना अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपलं आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली असताना काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील तापमानात पुढील चार ते पाच दिवसात झपाट्याने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तापमानाचा पारा 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चाललेला असून काही शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जाऊन पोहोचला आहे. विदर्भामध्ये सलग सहाव्या दिवशी तापमानाने उच्चांक गाठला आहे.

पुण्यात पावसाचा अंदाज (Rain forecast in Pune)

पुणे शहरामध्ये पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. शहरामध्ये आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुणे शहरामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यामध्ये दुपारच्या सुमारास तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, तर संध्याकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

‘या’ ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता (Chance of heat wave at ‘this’ place)

राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना, देशातली काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या ठिकाणी 18 ते 19 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम, ओडिसा, झारखंड आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ …

पुढे वाचा

Agriculture weather

Join WhatsApp

Join Now