🕒 1 min read
पुणे – ‘आता विरोध म्हणून विरोध केला जात नाही, तर तुमच्या अभिव्यक्तीवर वेगळ्याच शक्ती काम करतात. बोलायलाही धाडस करावे लागते आहे, असे आजूबाजूचे वातावरण झाले आहे. सध्या आपण अघोषित आणीबाणीच्या काळात वावरतो आहोत, असं स्पष्ट मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी शनिवारी व्यक्त केलं.
‘बेलवलकर सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान’ सोहळ्यात कुलकर्णी बोलत होते. यावेळी प्रसाद ओक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात सुमीत राघवन, समीर बेलवलकर, गार्गी फुले आणि राजेश दामले उपस्थित होते.
Chandrakant Kulkarni said Undeclared Emergency in India
कुलकर्णी म्हणाले, “पूर्वी निळू फुले, डॉ. लागू यांच्यासारखी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतही सरकारवर टीका करत. आज तशी धाडसाची माणसं कमीच आहेत. निळू फुलेंनी सामाजिक भान जपत आमच्यावर प्रभाव टाकला आणि नव्या पिढीसाठी उदाहरण उभं केलं.”
सुमीत राघवन यांनीही निळू फुलेंच्या संघर्षमय कारकिर्दीवर भाष्य करत म्हटलं, “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते नट म्हणून उभे राहिले. आजच्या ‘लाइक, शेअर, फॉलो’च्या दुनियेत फुलेंसारखी उदाहरणं युवा पिढीसमोर असायला हवीत.”
पुरस्कार स्वीकारताना प्रसाद ओक म्हणाले, “मराठी रंगभूमीवर निळू फुले हे विद्यापीठच होतं. त्यांनी मला घडवलं. त्यांच्याच नावाने पुरस्कार मिळणं ही मोठी सन्मानाची बाब आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यात 15 जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता!
- डोनाल्ड ट्रम्प सरकारचा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी
- ठाकरे-मनसे युतीच्या चर्चेला वेग; आदित्य ठाकरेंचा सकारात्मक सूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












