Share

डोनाल्ड ट्रम्प सरकारचा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी

Trump bans citizens from 12 countries citing national security and terrorism concerns.

Published On: 

Donald Trump reacts to India Operation Sindoor, calls it tragic, and hopes the conflict ends soon.

🕒 1 min read

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच कडक धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे. देशाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, ट्रम्प सरकारने तब्बल १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी लागू केली आहे.

ही प्रवेशबंदी अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांवर लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या मते, या देशांतील अनेक नागरिक दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

Donald Trump bans entry from 12 countries

इतकेच नव्हे, तर बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात देशांवर अंशतः बंदी घालण्यात आली आहे. या देशांतील नागरिकांना निवडक प्रकरणांमध्येच अमेरिकेत प्रवेश मिळू शकतो.

या निर्णयावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चाड सरकारने अमेरिकन नागरिकांना व्हिसा देणे थांबवण्याचा इशारा दिला आहे. तर अमेरिकेतही या निर्णयावर टीका होत असून याला असंवैधानिक ठरवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) समर्थक मात्र याला अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल मानत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!