Share

सत्ता आली म्हणून बाप झालात का? ओमराजेंचा नितेश राणेंना थेट सवाल

Omraje Nimbalkar slams Nitesh Rane over ‘BJP CM is everyone’s father’ remark.

Published On: 

Omraje Nimbalkar responds sharply to Nitesh Rane’s bold remark on BJP CM, citing vote difference and democracy.

🕒 1 min read

धाराशिव – भाजप आमदार नितेश राणे यांनी “सगळ्यांचा बाप भाजपाचा मुख्यमंत्री आहे” असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“सत्ता मिळाल्याने आपण बाप झालो, असं समजणं ही मस्ती आहे. ही मस्ती जनता उतरवेल,” असं ओमराजे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आलं असेल की आपण टाकलेलं मत चुकले आहे, ही सत्ताची मस्ती, सूज जनताच उतरवेल.”

Omraje Nimbalkar slams Nitesh Rane

ओमराजे यांनी राणे कुटुंबावर थेट निशाणा साधत म्हणाले, ”नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांच्या मिळून जेवढी मतं आहेत, त्यापेक्षा मी जास्त मतांनी निवडून आलो. म्हणजेच, बाप कोण ते जनता ठरवते,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, नितेश राणे यांनी धाराशिवमधील सभेत भाषण करताना “राज्यात सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसलेला आहे. 2029 ला भाजपाचेच आमदार निवडून यायला हवेत,” असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांचेच बंधू, निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. “महायुतीचं वातावरण बिघडू नये यासाठी शब्द जपून वापरावेत,” असा सल्ला त्यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही