🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी – भाजपा नेते नितेश राणे यांनी मनसे-ठाकरे युतीवर टीका करत उपरोधिक विधान केलं होतं, की “एवढं घाबरलोय की झोप लागत नाही, आमचं कसं होणार या प्रश्नाचा विचार करून आमच्या अंगाला घाम फुटतो.” त्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी राणेंना “लवंग – विलायची” अशी उपमा देत खरपूस समाचार घेतला.
प्रकाश महाजन म्हणाले की, “नितेश राणेंना वैचारिक खोली नाही, त्यांची वैचारिक उंची उभं राहिलं तर लवंगासारखे, बसलं तर विलायचीसारखी, अशांना गांभीर्याने घेणंही योग्य नाही.”
Prakash Mahajan Mocks Nitesh Rane
राणे यांनी यापूर्वी टीका केली होती की, “मनसे-ठाकरे गट एकत्र आले तरी आमचं काही बिघडणार नाही, पण एवढं घाबरलोय की झोप लागत नाही.” या विधानाचा प्रत्युत्तर महाजन यांनी उपरोधिकपणे दिलं.
महाजन यांनी असंही सांगितलं की, राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गात सभा घेतली होती, जिथं ते स्वतःही व्यासपीठावर होते. “राणे कुटुंब भाजपात आपली निष्ठा दाखवण्यासाठी काहीही बोलतात, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याचं कारणच नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र निवडणुका फिक्स होत्या – राहुल गांधींचा गंभीर आरोप
- एलॉन मस्कसोबत नाते संपले, आता गंभीर परिणामांना सामोरे जा – डोनाल्ड ट्रम्प
- ते २५ जागाही जिंकू शकत नव्हते… मोदी, फडणवीसांना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








