Share

तर ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येतायेत; दीपाली सय्यद यांचा मोठा आरोप

Dipali Sayyad slams Thackeray brothers, says political alliance is driven by self-interest.

Published On: 

Dipali Sayyad slams Thackeray brothers, says political alliance is driven by self-interest.

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी – राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. मनसेचे राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात असून यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी या युतीवर टीका केली आहे.

“जर भावकीच्या कारणासाठी दोघं एकत्र येत असतील तर ठीक, पण राजकारणासाठी असेल तर तो स्वार्थ आहे,” असं सय्यद ( Dipali Sayyad ) म्हणाल्या. “तुम्ही खूप उशीर केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच ही युती व्हायला हवी होती. आता एकत्र येण्यामागे केवळ राजकीय फायद्याचा हिशोब दिसतो,” असा आरोप त्यांनी केला.

Dipali Sayyad slams Thackeray

दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करत म्हटलं, “बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांची पोकळी जर कोणी भरून काढली असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे. नेता कसा असावा, जो रस्त्यावर उतरून गोरगरिबांचा विचार करणारा, त्यांच्या मनातले ऐकणारा आणि त्यांच्यासाठी काम करणारा नेता असला पाहिजे. हेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, असं त्या म्हणाल्या.

तसंच, उद्या शिवसेनेत काही मोठे चेहरे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. “हे पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या हितासाठी असून, संजय राऊत यांच्याशी संबंधित काही लोक यात सामील होणार आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!