NCP | पुण्यात खासदारकीसाठी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी; पाहा काय आहे प्रकरण

NCP | पुणे : लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुण्यातील रिक्त झालेल्या जागेच्या निवडणुकांच्या चर्चेला उधाण आलं आहे. तर भाजपकडुन देखील निवडणूकिसाठी तीन नाव समोर आली आहेत. दुसरीकडे मविआ कडून देखीलहालचाली सुरू झाल्या आहेत. मविआमधील कसबा मतदारसंघातुन निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर याचं नाव समोर येत असतानाच पुण्यात थेट भावी खासदार म्हणून एका राष्ट्रवादी नेत्याचं पोस्टर व्हायरल झालं आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच भाजपकडून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांची नाव चर्चेत होती, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांच्या नावाचा बॅनर झळकत असल्याने राष्ट्रवादी देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, अचानक झलकणाऱ्या या बॅनरबाजीमुळे मविआ मध्ये नक्की काँग्रेस ही जागा लढणार की राष्ट्रवादी याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. तर भाजपकडून जी तीन नाव चर्चेत होती त्यामध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र ही नावं मागे पडली असून, स्वरदा बापट आणि मोहळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. यामुळे आता पुण्याच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजप आणि मविआ मधील कोण ही जागा लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या –