Ajit Pawar | “… म्हणून मी जयंत पाटीलांना फोन केला नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल अँड एफएस कंपनी घोटाळा प्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. चौकशी झाल्यानंतर मला अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. मात्र, अजित पवारांचा फोन आला नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटीलांनी दिली होती. जयंत पाटील यांना फोन का केला नाही? यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

Ajit Pawar told the reason for not calling Jayant Patil

जयंत पाटील यांना फोन का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “जयंत पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलवलं नाही. याआधी छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांना देखील बोलवलं होतं. मी त्यांना देखील फोन केले नव्हते. कारण आम्ही भेटून बोलणार होतो. जयंत पाटलांना देखील मी भेटून बोलणार आहे, म्हणून फोन केला नाही. जाणीवपूर्वक या घटनेचे वेगळे अर्थ काढू नका.

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “मी आत्तापर्यंत कोणाच्याही बाबतीत कोणतेही मत व्यक्त केलं नाही. आयकर विभागाने माझ्याही बाबतीत 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी काय ते मी बोललो होतो. त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाला लागलो.”

“भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी कधीच होत नाही. सूडभावनेतून चौकशीला बोलावणं अत्यंत चुकीचं आहे. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया दिली नाही. मी त्यांना भेटेल तेव्हा त्यांना बोलेल,” असही ते (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.