Share

A. R. Rahman | ए. आर. रहमान यांचाच शो का बंद पाडला? इतर दिवशी पुणे पोलीस झोपा काढतात का? पुणेकरांचा प्रश्न

🕒 1 min read A. R. Rahman Pune । प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman ) यांचा पुण्यातील शो पुणे पोलिसांनी बंद पाडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रहमान यांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता?  रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई … Read more

Published On: 

🕒 1 min read

A. R. Rahman Pune । प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman ) यांचा पुण्यातील शो पुणे पोलिसांनी बंद पाडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रहमान यांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता?  रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे हे तुम्हाला माहीत नाही काय? अशा शब्दात पोलिसांनी रहमान यांना सुनावले. त्यानंतर ए. आर. रहमान पोलिसांशी कोणताही वाद न घालता स्टेजवरून निघून गेले.

पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी (30 एप्रिल) रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तसेच पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. 10 वाजल्यानंतरही ए. आर. रहमान यांचा हा गाण्याचा कार्यक्रम सुरूच होता.

पुणे पोलिसांवर ( Pune Police ) पुणेकरांची टीका 

राजा बहादुर मिल परिसरात रात्री उशिरा पर्यंत दररोज धिंगाणा चालू असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. विशेषतः शनिवार आणि रविवार येथील हॉटेल सकाळी ४ वाजेपर्यंत चालू असल्याचे सर्वसामान्य नागरिकांनी सांगितले. वारंवार पोलिसांना तक्रार करूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. उलट ज्याने तक्रार केली त्यालाच त्रास देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या परिसरात उशिरा पर्यन्त मद्य विक्री आणि मोठया आवाजात गाण्याचे कार्यक्रम चालू असतात. येथे मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी हजेरी लावतात.

राजा बहादुर मिल परिसर सायलेंट झोन असतांना पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी कशी दिली ? यावरून आश्चर्य व्यक्त होत आहे. परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत. तसेच या कार्यक्रमामुळे पुणे स्टेशन आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, अनेकांना याचा मनस्ताप झाला आहे. या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आणि आयोजकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

ए. आर. रहमान यांचाच शो का बंद पाडला? इतर दिवशी कायदा आणि सुव्यवस्थचे काय? फक्त रहमान यांनाच कोर्टाने 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केली का? असे अनेक प्रश्न पुणेकर पोलिसांना विचारात आहेत.

आयोजकांवर कोण मेहरबान?

अमृता फडणवीस यांची कार्यक्रमला हजेरी  ( Amuta Fadnvis Inaugurated Arijit Singh concert in Pune )

काही दिवसापूर्वी याच 2BHK हॉटेलने अरिजित सिंगचा शो आयोजित केला होता. त्या शोला अमृता फडणवीस यांच्यासह पुण्यातील नामंकित मंडळी उपस्थित होते. त्यात विभागीय आयुक्त श्री सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, जॉइंट सीपी संदिप कर्णिक आणि पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला हजर होते.

ए. आर. रहमान ट्वीट | A.R.Rahman Tweet

 

ए. आर. रहमान यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘काल रात्री पार पडलेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! हा रोलर कोस्टर कॉन्सर्ट होता. शास्त्रीय संगीताचं माहेरघर म्हणजे पुणे! आम्ही लवकरच तुमच्या समोर गाणं गण्यासाठी परत येऊ!’ या ट्विट मध्ये रहमान यांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि 2 BHK हॉटेलचे संचालक हेरंब शेळके ( Dr. Heramb Shelke ) यांना टॅग केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

[emoji_reactions]

Crime Entertainment Explained India Maharashtra Marathi News Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या