IND vs PAK: भारत-पाकिस्तान मॅच म्हटलं की नुसता थरार. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला दिलेल्या ताज्या मुलाखतीत सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) एक मोठा गौप्यस्फोट केला. वर्ल्डकपच्या त्या हायव्होल्टेज सामन्यात कुलदीप यादव अचानक का भडकला होता? आणि सूर्याचा पारा का चढला होता? यावर सूर्याने मनमोकळी गप्पा मारल्या आहेत.
‘तो’ सुटलेला कॅच आणि सूर्याचा संताप…
कुलदीप यादवला त्या मॅचमध्ये गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे तो आधीच नाराज होता. त्यातच बाऊंड्रीवर त्याने एक सोपा कॅच सोडला. कॅच सुटला याचा राग नव्हता. पण, तो घेण्यासाठी कुलदीपनं साधा प्रयत्नही केला नाही. त्यामुळेच माझा पारा चढला, असं सूर्याने सांगून टाकलं.
त्या मॅचमध्ये सूर्याने अक्षर पटेलची ओव्हर संपल्यावर तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्याला बॉलिंग दिली. त्यामुळे ‘माझा नंबर का येत नाही?’ असा प्रश्न कुलदीपला पडला होता. या नाराजीतूनच त्याने लाँग-ऑनवर कॅच सोडला. या प्रकारावरून हार्दिक पांड्याही त्याच्यावर भडकला होता.
मैदानावरील हा वाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर टीममध्ये फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, सूर्याने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. सामन्यानंतर आम्ही रागाने बघितलं, पण ती फक्त चेष्टा होती. नंतर अहमदाबादमध्ये एक रील बनवून आम्ही हा विषय तिथेच संपवला, असा खुलासा सूर्याने केलाय. या सामन्यात ईशान किशनच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला लोळवलं होतं.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘उद्या तुम्ही मला मारताल…’; शिंदेंच्या समोरच बंडू जाधवांनी मनोज जरांगेंची जाहीर माफी मागितली
- शिंदेंच्या उपस्थितीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर परभणीत नेमकं काय घडलं?
- ‘ते काही संत नाही… त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा’; दास, रंका आणि दिपकेंबद्दल सोनम वांगचुक यांचा मोठा गौप्यस्फोट
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








