तुम्ही आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात का? थोडं थांबा, कारण पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं असून, पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे ठरणार आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD red alert) आज राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये थेट अतिवृष्टीचा इशारा (Maharashtra Rain Alert) दिला आहे. पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain Update
यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा थेट रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे आदेश देत सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे.
धामक गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दुकाने आणि नागरिकांच्या घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलैच्या अखेरीस पावसाने दमदार कमबॅक केले आहे. नंदुरबारमध्ये सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर आता जोरदार मुसळधार सुरू आहे. वाशिममध्येही रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली.
वाशिममधील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मालेगाव आणि मानोरा या सर्व सहा तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. सुदैवाने अजून कुठेही पूरस्थिती नसली तरी, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
त्यामुळेच हवामान विभागाने ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, सातारा आणि जळगावमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवोलीना भट्टाचार्जीच्या पोस्टमुळे मोठा वाद; ‘मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरज…..’, सोशल मीडियावर नवा वाद!
- NEET आंदोलकांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय, सर्व FIR मागे
- अभिजीत दिपकेंचा मोदींवर हल्लाबोल: ‘तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा…’, इन्स्टाग्रामवरील ‘ती’ कमेंट चर्चेत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












