विद्यार्थ्यांवर निर्दयीपणे लाठ्या बरसताना पाहून जर कुणाला आनंद होत असेल, तर आपण माणसं राहिलो नाही, आपण चक्क ‘झोंबी’ झालो आहोत… हे उद्विग्न शब्द आहेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले (Sameer Choughule) यांचे.
नीट (NEET) पेपरफुटी (NEET Protest) आणि त्यानंतर संसदेवर धडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे व्हिडीओ पाहून चौघुलेंनी थेट फेसबुकवर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Sameer Choughule on NEET Protest
पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांबद्दल एका युजरने अत्यंत असंवेदनशील पोस्ट केली होती. यावर संताप व्यक्त करताना समीर म्हणाले, “ती पोस्ट वाचून मी सुन्न झालो. तरुण कोवळ्या मुला-मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडला आहे.”
प्रत्येक प्रश्न संवादाने आणि चर्चेने सुटू शकतो, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये आणि मुलांच्या प्रश्नांना सगळ्यात आधी प्राधान्य दिलंच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
एवढंच नाही तर, त्यांना ट्रोल करू पाहणाऱ्यांनाही चौघुलेंनी पोस्टमधूनच सडेतोड उत्तर देऊन ठेवलं. “कलाकारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावं, असा शहाणपणा शिकवू नका. मीही या देशाचा नागरिक आहे,” असं ते म्हणाले.
तसेच, ‘या पोस्टसाठी किती पैसे मिळाले?’ असं विचारणाऱ्यांना त्यांनी ‘तुम्हाला मिळतात त्यापेक्षा थोडे जास्त’ असा भन्नाट टोला लगावला. ज्यांना अनफॉलो करायचं आहे त्यांनी ते शांतपणे करावं, पण कमेंट्समध्ये गलिच्छ भाषा वापरू नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- NEET आंदोलनासाठी ठाकरे बंधू एकत्र; 26 जुलैला संयुक्त मोर्चाची घोषणा, मोदी सरकारवर जोरदार टीका
- PM मोदींची पेपरफुटीवर पहिली प्रतिक्रिया; फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करणार! दोषींना कठोर शिक्षा
- Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरूच; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












