🕒 1 min read
मुंबई: राज्यातील मुसळधार पाऊस, मुंबईतील दुर्घटना आणि शिवसेना ठाकरे गटातील (Shivsena Thackeray Gat) राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Govt) जोरदार निशाणा साधला. अयोध्येतील राम मंदिरातील (Ayodhya Ram Mandir) कथित चोरीच्या निषेधार्थ दादरमधील हनुमान मंदिराजवळ आयोजित आंदोलनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आणि एका आमदाराने पक्षाची साथ सोडल्यानंतर पक्ष अलर्ट मोडमध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी येत्या मंगळवारी ‘मातोश्री’वर आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राम मंदिरातील चोरीच्या निषेधासाठी आयोजित आंदोलनात पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.
मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री (DCM) यांनी स्वतः रेनकोट घालून शहरात फिरावे आणि नागरिकांची अवस्था पाहावी. सरकार विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात विकासाऐवजी भ्रष्टाचार आणि दलाली वाढली आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्पाचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, “सरकार दोन खड्डे पडल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात संपूर्ण मिसिंग लिंकच कोसळली आहे.” या घटनेमागे भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामकाज कारणीभूत आहे. ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेतल्यामुळे अशा घटना घडत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
याच संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही खोचक टीका केली. “एवढा विकास झाला की त्याच विकासाचा धक्का बसून राज्याचे एक उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.”
एका बाजूला नागरिकांचा मृत्यू होत असताना सत्ताधारी नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करणे अपेक्षित आहे, असे मुंबईतील दुर्घटनांचा उल्लेख करत राऊत म्हणाले.
या मुंबईवर (Mumbai) आणि महाराष्ट्रावर (Maharashtra) दुर्योधनाचे राज्य आले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे राज्याची अवस्था बिकट झाली आहे. राम मंदिरासह (Ram Mandir) देशातील विविध मंदिरांमध्ये झालेल्या कथित चोरीच्या घटनांवरूनही संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. मंदिरांचे संरक्षण करण्याच्या नावावर राजकारण केले जात असले तरी प्रत्यक्षात मंदिरांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी सरकारवर आणखी टीका करत मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “25 वर्षांचा हिशेब विचारण्याऐवजी गेल्या साडेचार वर्षांत तुम्ही काय केलं, याचं उत्तर द्या. मुंबई महानगरपालिका गेली साडेचार वर्षे तुमच्या ताब्यात आहे. एवढ्या काळात मुंबईतील रस्ते, मिठी नदी आणि विकासकामांची अवस्था काय झाली, हे जनतेसमोर आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून महापालिका चालवली जात असून, मुंबईची मोठी दुरवस्था करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाची सद्यस्थिती आणि पावसात वाहून गेलेले रस्ते हेच विकासाचं वास्तव चित्र आहे,” असा आरोप त्यांनी केला.
याशिवाय, गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रकल्पाचाही उल्लेख करत राऊत यांनी खर्चावर प्रश्न उपस्थित केले. “सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा प्रत्यक्ष खर्च सुमारे साडेतीनशे कोटी रुपये असल्याची चर्चा आहे, मात्र तो 3 हजार कोटी रुपयांचा दाखवण्यात आला. उर्वरित निधी कुठे गेला, याचं उत्तर सरकारने द्यावं. प्रभू श्रीराम, सीतामाई किंवा सरदार पटेल यांच्यासारख्या राष्ट्रीय प्रतीकांच्या नावानेही भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप आता समोर येत आहेत,” असे ते म्हणाले.
जबाबदारीच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “महापालिकेचा कारभार ज्यांच्या ताब्यात आहे, जबाबदारीही त्यांचीच आहे. महापौर, सत्ताधारी पदाधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यायला हवे. प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदारांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये,” अशी टीकाही त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आजचा दिवस गंभीर!’ 90 किमी वेगाने वारे वाहणार; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती
- Maharashtra Heavy Rain: महाराष्ट्रात पावसाचा कहर; मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत, शाळांना सुट्टी
- उपमुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात; तब्येतीबाबत मोठी माहिती समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












