Share

‘आजचा दिवस गंभीर!’ 90 किमी वेगाने वारे वाहणार; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती

आज दुपारनंतर 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Published On: 

CM Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विधिमंडळात (Monsoon Session of the Maharashtra Legislature) बोलताना त्यांनी सांगितले की, आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना वाढू शकतात.

मुंबईत मान्सून (Mumbai Rain) काळात सरासरी 800 झाडे कोसळतात. मात्र, काल एकाच दिवसात सुमारे 350 झाडे कोसळली, तर आजची परिस्थिती त्याहून अधिक गंभीर असू शकते. त्यामुळे शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा (Work From Home) पर्याय स्वीकारावा, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (Avoid Travel)

विशेषतः युवकांनी जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन आणि अनावश्यक प्रवास टाळावा. नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मुंबईतील दुर्घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोसळलेली इमारत बेकायदेशीर होती. त्या इमारतीतील रहिवाशांचा जीव वाचला असला तरी शेजारील झोपडीवर इमारत कोसळल्याने काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या घटना अतिशय गंभीर आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai–Pune Expressway) दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तातडीने यंत्रणा कार्यरत केली. वाहतूक त्वरित पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. अडकलेल्या वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली. संपूर्ण प्रशासन, महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. आजच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन उद्या सभागृहात संपूर्ण निवेदन सादर केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही