Share

ओमराजे निंबाळकर धाराशिवच्या वाटेवर; कुटुंबावरील विकृत टीकेनंतर संतापले, आजच घेणार मोठा निर्णय?

कुटुंबावर झालेल्या टीकेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर संतापले असून, धाराशिवच्या जनतेशी चर्चा करून ते आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत.

Published On: 

Omraje Nimbalkar talking to media about his political decision in Dharashiv

🕒 1 min read

पुणे – पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येतील आरोपींची तब्बल वीस वर्षांनंतर झालेली निर्दोष मुक्तता आणि दुसरीकडे स्वतःच्याच पक्षातील फुटीर गटाला पाठिंबा देण्यावरून होणारी घुसमट. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) सध्या अशाच एका राजकीय आणि भावनिक चक्रात अडकले आहेत. या धक्क्यातून सावरत त्यांनी आता मोठा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे.

या दुहेरी संकटात सापडलेले ओमराजे आता आरपारच्या लढाईच्या मानसिकतेत आहेत. सध्या ते थेट धाराशिवच्या दिशेने रवाना झाले असून, तिथल्या स्थानिक जनतेशी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आपला अंतिम राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत.

उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नसतानाही सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाला थेट लक्ष्य करण्यात आले. त्यामुळेच ते आता प्रचंड संतापले आहेत.

“राजकीय प्रक्रियेत माझ्या कुटुंबाने कुणाचे काय वाटोळे केले आहे? केवळ एका चर्चेमुळे मी इतका वाईट झालो का?”, असा खडा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मला ‘रीलस्टार’ म्हणून हिणवण्यात आलं, पण रीलस्टार असलेल्या माणसाला लोक मतदान करून संसदेत पाठवतात का, असा पलटवारही त्यांनी केला.

दुसरीकडे, वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालावरही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. वीस वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतरही हाती निराशाच आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

“न्यायालयाने राजकीय वैमनस्य आणि हत्येचा उद्देश मान्य केला आहे; मग ती हत्या नेमकी केली कुणी?” असा थेट आणि धारदार प्रश्न त्यांनी विचारला. आता या निकालाविरोधात सीबीआयच्या साथीने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

वडिलांच्या हत्येनंतरच आपला राजकीय प्रवास सुरू झाला आणि सामान्य जनतेनेच आपल्याला इथवर पोहोचवले, याची आठवण त्यांनी करून दिली. अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, ओमराजे आज संध्याकाळपर्यंत धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांचा कौल घेतील. आता ते नेमका कोणता मार्ग निवडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही