Share

ठाकरांच्या खासदारांना प्रत्येकी १५ कोटी? संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने महाराष्ट्राचे राजकारण तापले

ठाकरे गटाचे खासदार विकत घेण्यासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे.

Published On: 

Sanjay Raut Tweet regarding Shiv Sena MPs rebellion in Delhi

मुंबई – एका लोकप्रतिनिधीची किंमत तब्बल १५ कोटी रुपये असू शकते का? शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात केलेल्या एका खळबळजनक दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे.

महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपयांचा ॲडव्हान्स दिला जात असल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या व्यवहाराचा आकडा जाहीर केला आणि थेट देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. त्यामुळेच आता मध्यरात्री मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sanjay Raut Tweet: दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ वेगवान?

राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची गुप्त चर्चा सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे पाच ते सहा प्रमुख खासदार अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे समजते.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदार सध्या पक्षांतराच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे. या खासदारांनी आधीच उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व हालचाली सुरू असतानाच एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झाल्याने या दाव्यांना अधिक बळ मिळाले आहे.

येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिन आहे. या दिवसापूर्वीच हे नाराज खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र देऊ शकतात. हा गट पुढे एनडीएला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. राऊतांच्या या मोठ्या गौप्यस्फोटानंतर आता हे खासदार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही