Share

शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांतच दुसऱ्यांदा हनिमूनला, पत्नी सोफीसोबत थेट… पाहा PHOTOS

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांनंतरच पत्नी सोफी शाईनसोबत बालीमध्ये दुसरा हनिमून साजरा करत असून रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत.

Published On: 

Shikhar Dhawan Second Honeymoon: गब्बरचे रोमँटिक फोटो!

लग्नाला जेमतेम ३ महिने उलटत नाहीत तोच, टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणजेच शिखर धवन (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. फेब्रुवारी २०२६ मध्ये सोफी शाईनसोबत दुसरा संसार थाटल्यानंतर, आता हा स्टार खेळाडू चक्क दुसऱ्यांदा हनिमूनला रवाना झाला आहे.

सध्या इंटरनेटवर Shikhar Dhawan Wife Sophie चे हॉट आणि रोमँटिक फोटो तुफान व्हायरल होत आहेत. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत हे जोडपं सध्या इंडोनेशियातील बालीच्या निसर्गरम्य वातावरणात सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Shikhar Dhawan Second Honeymoon

सोफीनं स्वतःच्या इन्स्टाग्रामवरून या ट्रिपचे अनेक फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. या व्हायरल फोटोंमध्ये सोफीचा अत्यंत बोल्ड आणि स्पोर्टी अंदाज पाहायला मिळतोय. तिनं ‘स्पोर्ट्स ब्रा’ आणि डोक्यावर हॅट असा स्टायलिश लूक कॅरी केलाय.

विशेष म्हणजे, सुट्ट्यांचा आनंद घेतानाही सोफीने फिटनेसकडे दुर्लक्ष केलेलं नाही. चक्क बालीमध्येही तिने जिममध्ये घाम गाळल्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती आरोग्याबाबत किती जागरूक आहे, हे दिसून येतं.

दुसरीकडे, शिखर धवनही फुल ऑन मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. सोफीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शिखरचा समुद्रकिनाऱ्यावरील एक अप्रतिम फोटो शेअर केलाय. त्याच्या चेहऱ्यावरील विस्तीर्ण हास्य सांगून जातंय की तो या क्षणांचा किती मनमुराद आनंद लुटतोय.

शिवाय, या जोडप्याने हॉटेलमधील एका सुंदर सरप्राईजचा आणि हेल्दी ब्रेकफास्टचा फोटोही चाहत्यांसोबत शेअर केलाय. शिखर आणि सोफीची ही भन्नाट केमिस्ट्री पाहून चाहते अक्षरशः प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अनेकांनी त्यांना ‘सेकंड हनिमून’ च्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानातून बाहेर असलेला गब्बर आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खऱ्या अर्थाने सुखाचे क्षण जगत असल्याचं या फोटोंवरून स्पष्ट होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही