Share

भारती सिंह आणि हर्षचा घटस्फोट? ‘त्या’ एका वक्तव्याने खळबळ; नेटकरी म्हणाले, “पोरं जन्माला घालायची अन्…”

भारती सिंहच्या एका मजेशीर यूट्यूब व्लॉगमुळे तिच्या आणि हर्षच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या खोट्या बातम्यांवर आता भारतीनेच संताप व्यक्त केला आहे.

Published On: 

Bharti Singh Divorce: भारती सिंह घेणार घटस्फोट?

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत कधी कुणाचं काय बिनसेल आणि कोण कधी वेगळं होईल, हे आजकाल अजिबात सांगता येत नाही. पण आता चक्क संपूर्ण देशाला खळखळून हसवणाऱ्या भारती सिंहच्या (Bharti Singh) घरातील वादाची चर्चा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

गेले काही दिवस भारती आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांच्यात काहीही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ४१ वर्षीय भारतीने तिच्या यूट्यूब व्लॉगवर एक वक्तव्य करत आगीत तेल ओतण्याचं काम केलं.

Bharti Singh Divorce

“मी आता हर्षसोबत राहू शकत नाही, छोट्या-छोट्या गोष्टींवरून आमच्यात चिडचिड होतेय,” असं ती या व्हिडीओत म्हणाली. हे ऐकून चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पुढच्याच सेकंदाला हा केवळ एक विनोद असल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी तोपर्यंत या व्हिडीओची क्लिप वाऱ्यासारखी पसरली होती.

यावर एका युजरने अतिशय संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलंय की, “पोरं जन्माला घालायची आणि घटस्फोट घ्यायचा हे यांच्यासाठी कॉमनच आहे.” तर काहींनी ‘नेमकं चाललंय काय?’ असा सवाल उपस्थित केला. सध्या Bharti Singh divorce या विषयावरून सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला आहे.

या सर्व खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना भारतीने तिच्याच खास स्टाईलने फैलावर घेतलं. “आमच्या घरात लिंबू खराब निघतायत, आणि लोक म्हणतातय आमच्या नात्यात कटुता आलीय,” असा सणसणीत टोला तिने लगावला.

तुम्ही तर माझ्या आणि कपिल शर्माच्याही पुढे गेलात, असा चिमटाही तिने काढला. २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकलेली ही जोडी आजही तितक्याच आनंदात असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे, त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही