🕒 1 min read
राजकारणात कधी कोणता नेता कोणती गुगली टाकेल, याचा काहीच नेम नसतो. आता हेच बघा ना, क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या ‘भज्जी’ने राजकीय मैदानात अशीच एक अनपेक्षित फिरकी टाकली आहे. माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) ‘आम आदमी पार्टी’चा (AAP) राजीनामा देत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
झाडू बाजूला ठेवून आता हरभजन कमळाची साथ देणार असल्याच्या चर्चांनी दिल्लीपासून पंजाबपर्यंतचं राजकारण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी दुपारी ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत हा मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या दाव्यानुसार, हरभजन सिंग लवकरच ‘आप’च्या आणखी सात खासदारांसह भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करू शकतो. जर असं झालं, तर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा एक प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे.
Harbhajan Singh Joins BJP
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर २०२१ मध्ये हरभजनने सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये तो ‘आप’च्या तिकिटावर पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेला होता. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर पंजाबमधून राजकारणात येणारा तो दुसरा बडा क्रिकेटपटू ठरला होता. पण आता अवघ्या काही वर्षांतच त्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
आपल्या कारकिर्दीत १०३ कसोटी, २३६ वनडे आणि २८ टी-२० सामने खेळणाऱ्या ४५ वर्षीय भज्जीच्या नावावर शेकडो विकेट्स आहेत. आता या स्टार खेळाडूच्या राजकीय पिचवरच्या नव्या इनिंगकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. हरभजनच्या अधिकृत भाजप प्रवेशाची अद्याप पुष्टी झाली नसली, तरी या एका बातमीने राजकीय मैदान मात्र चांगलंच ढवळून निघालंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आमच्यात १५ वर्षांचं अंतर…’, रुचितासोबतच्या नात्यावर विशाल कोटीयनने सोडलं मौन, म्हणाला…
- संजू सॅमसनचा वानखेडेवर झंझावात; ‘त्या’ खेळीवर चक्क शशी थरुरांनी रचली कविता
- ऐश्वर्या नारकरांचा संताप अनावर; Video शेअर करत सांगितला घडलेला मोठा स्कॅम, म्हणाल्या……













