🕒 1 min read
मुंबई: राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करणारे दोन्ही अध्यादेश रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर, या निर्णयावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्रचा नारा बुलंद झाला,” असे म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी भाजपा सरकारला इशारा देत, “कुठलीही समिती नेमा, महाराष्ट्रावर आता हिंदी सक्ती होऊ शकत नाही,” असे ठामपणे सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या निर्णयाचे श्रेय महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना आणि सर्वपक्षीय नेत्यांना दिले. ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्र हा नारा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यामागे शिवसेना आणि शिवसैनिक तर होतेच, पण ज्या ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरून सहभाग घेतला, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो.”
Uddhav Thackeray warns Devendra Fadnavis govt
पुढे बोलताना त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. “सरकारला शहाणपण सुचलं आहे की नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. पण हिंदी सक्तीचा जीआर सध्या रद्द केला आहे. जर सरकारने तो रद्द केला नसता, तर ५ जुलैच्या मोर्चात भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटातील मराठी प्रेमीही सहभागी झाले असते आणि होणारच आहेत,” असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. “मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असायला हवं,” असे आवाहनही त्यांनी ( Uddhav Thackeray ) केले.
सरकारने त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या निर्णयावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. “सरकारने एक समिती नेमली आहे. समिती कुठलीही असू दे, पण हिंदी सक्ती हा विषय आता संपला आहे. महाराष्ट्रावर हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
५ जुलै मोर्चाबाबत उद्धव ठाकरेंनी सांगितले की, “५ जुलैला विजयी मेळावा की मोर्चा, काय ते मी दोन ते तीन दिवसांत स्पष्ट करेन.” ते पुढे म्हणाले, “मराठी द्रोही जे डोकं वर काढतात ते आपण चेपले आहे. पण आपल्या एकजुटीसाठी संकटाची वाट न पाहता ती अशीच कायम ठेवू, म्हणजे असे लोक पुन्हा फणा वर काढणार नाहीत.” ५ जुलैला विजयी उत्सव साजरा होणार असून, त्यावेळी मराठी माणसाची एकजूट पाहायला मिळेल, असेही त्यांनी ( Uddhav Thackeray ) सांगितले.
सरकारला मराठी आणि अमराठी असा वाद घडवून आणायचा होता, मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही, म्हणूनच हा जीआर रद्द करण्यात आला, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “परत सरकार अशा भानगडीत…”, राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस सरकारला इशारा
- फडणवीस सरकार झुकलं! हिंदी सक्तीचा निर्णय रद्द; ठाकरे बंधूंचा ५ जुलैचा मोर्चा स्थगीत – संजय राऊत
- केतूचे नक्षत्र परिवर्तन: ६ जुलैपासून ‘या’ तीन राशींना मिळणार धनलाभासह प्रगतीची संधी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












