Share

भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह ‘वाका वाका’ डान्स! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘आमच्या वेळी अशा शिक्षिका…’

Teacher dances to ‘Waka Waka’ with students; viral video wins hearts.

Published On: 

Teacher-Student 'Waka Waka' Dance Goes Viral, Wins Hearts

🕒 1 min read

पुणे: समाजमाध्यमांवर सध्या शाळांमधील एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका आपल्या विद्यार्थिनींसोहीत चक्क प्रसिद्ध गायिका शकीराच्या ‘वाका वाका’ ( Waka Waka ) गाण्यावर थिरकताना दिसत आहे. शिक्षिकेचा हा उत्साही अंदाज आणि विद्यार्थिनींचा तिला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रेम दिले आहे. अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण काढत, “आमच्या वेळी अशा शिक्षिका का नव्हत्या?” अशी भावना व्यक्त केली आहे.

आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि पूर्वीच्या पद्धतीमध्ये खूप मोठा फरक दिसून येतो. केवळ अभ्यासच नव्हे, तर मुलांचे छंद, कला आणि आवडीनिवडी यांनाही आता महत्त्व दिले जात आहे. पूर्वी शिक्षक अनेकदा विद्यार्थ्यांना शिक्षा किंवा मारहाण करत शिकवत असत, पण आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना प्रोत्साहन देत नवीन गोष्टी शिकवतात. यामुळे शिक्षण अधिक आनंददायी होत असल्याचं चित्र आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ याच बदलत्या शिक्षण पद्धतीचं एक उत्तम उदाहरण आहे.

Teacher-Student ‘Waka Waka’ Dance

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिक्षिका शकीराच्या लोकप्रिय ‘वाका वाका’ गाण्यावर उत्साहाने नाचत आहे आणि तिच्या लहान विद्यार्थिनीही तितक्याच उत्साहात तिला साथ देत आहेत. वर्गातच सुरू असलेला हा डान्स पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतो. Waka Waka हा व्हिडीओ शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमधील मैत्रीपूर्ण नातं आणि शाळेतील सकारात्मक वातावरण दर्शवतो.

इन्स्टाग्रामवरील @arpita_lucky या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत आठ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. नेटकऱ्यांकडून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत:

“खूप भारी डान्स,” एका युजरने म्हटले.

“आमच्या वेळी असे शिक्षक का नव्हते?” अशी हळवी प्रतिक्रिया आणखी एकाने दिली.

“अभ्यासाबरोबर कलेचं शिक्षण… खूप छान,” असे कौतुक एका युजरने केले.

तर एका व्यक्तीने “असे शिक्षण प्रत्येक शाळेत असायला हवे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही