🕒 1 min read
अहमदाबाद : आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. या निर्णायक सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) मोठा विश्वास व्यक्त केला आहे. “यंदाची ट्रॉफी विराट कोहलीसाठी जिंकणार,” असा ठाम निर्धार पाटीदारने व्यक्त केला.
पाटीदार म्हणाला की, “आम्ही पहिल्यांदाच आयपीएल जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहोत आणि ही संधी विराट कोहलीसाठी खास बनवायची आहे.” त्याच्या म्हणण्यानुसार, संघात नवे खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले क्रिकेटर्स यांच्यात समतोल ठेवत आत्मविश्वास निर्माण करणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे.
“Virat Kohli will win the trophy”, said captain Rajat Patidar…
टीम डेविडच्या फिटनेसविषयी विचारले असता, अंतिम निर्णय वैद्यकीय टीम घेईल, अशी माहिती त्याने दिली. “डॉक्टर्स आजूबाजूला आहेत, उद्या याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,” असंही त्याने स्पष्ट केलं.
कर्णधार म्हणून त्याचा प्रवास शिकवणारा ठरल्याचे पाटीदार म्हणतो. “नेतृत्व करताना तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात, पण माझा फोकस नेहमी सध्याच्या क्षणावर असतो,” असे तो म्हणाला.
पाटीदार आणि पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात याआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लढत झाली होती. “श्रेयनं चांगलं नेतृत्व केलं आहे. त्याच्याविरुद्ध फायनल खेळणं ही एक नवी प्रेरणा आहे,” असंही तो म्हणाला.
आरसीबीने याआधी तीन वेळा (2009, 2011, 2016) आयपीएल फायनल गाठली असून त्यांना अजूनही पहिले विजेतेपद मिळवता आलेलं नाही. तर पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहे. या दोघांमध्ये होणारी अंतिम लढत उत्कंठावर्धक ठरणार हे नक्की.
📌 महत्वाच्या बातम्या
- ICC Womens World Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
- विचारधारा वेगळी, पण कुटुंब एकच; अजित पवारांचं राष्ट्रवादी एकत्रिकरणावर भाष्य
- “मी चक्रम आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही” – संजय शिरसाटांचा विरोधकांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












