Share

कोरोना पुन्हा आला? मुंबई-पुण्यात वाढले रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिला मोठा सल्ला!

Maharashtra COVID Update: Health Minister Prakash Abitkar Urges Public Not to Panic

Published On: 

Maharashtra COVID 19 Update: Health Minister Prakash Abitkar Urges Public Not to Panic

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत असून, मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये नवे रुग्ण समोर येत आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, पुण्यातही रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ( Prakash Abitkar ) यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना घाबरू नका असं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “राज्यात कोरोनाबाबत चिंता वाढतेय हे खरं आहे, मात्र राज्य सरकार सज्ज आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. त्यामुळे कोणतीही अफवा पसरवू नका, आणि घाबरून जाऊ नका.”

COVID cases rising in Maharashtra, but no need to panic, says Health Minister Prakash Abitkar

त्यांनी केईएम रुग्णालयात झालेल्या दोन मृत्यूबाबत स्पष्टीकरण दिलं की, हे मृत्यू थेट कोरोनामुळे नाहीत, तर त्या रुग्णांना को-मॉर्बिडिटीज होत्या. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, पण ज्यांना आधीपासून इतर गंभीर आजार आहेत, त्यांनी अधिक खबरदारी घ्यावी.

तसेच, हाँगकाँगहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतीही नवी मार्गदर्शक तत्वं केंद्र सरकारकडून आलेली नाहीत. आली, तर त्याचे पालन करण्यात येईल, असं आबिटकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये आढळलेला LF.7 आणि NB.1 व्हेरिएंट महाराष्ट्रात येऊ नये यासाठी सरकार सतर्क आहे. या नव्या व्हेरिएंटची लक्षणं म्हणजे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. गंभीर परिस्थितीत श्वास घेण्यास त्रास होणं हे धोक्याचं लक्षण आहे. राज्य सरकार सध्या PHC (प्राथमिक आरोग्य केंद्र) च्या उभारणीकडेही लक्ष देत आहे. काही ठिकाणी रुग्णसेवा सुरू झाली असून उर्वरित ठिकाणी लवकरच सुरू होईल, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही