Share

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या जाळ्याचा भंडाफोड; ज्योती मल्होत्रासह ११ जण गजाआड

After Jyoti Malhotra’s arrest in Haryana for spying for Pakistan, 10 more people across three states have been detained. This is the biggest crackdown since the Pahalgam attack.

Published On: 

After Jyoti Malhotra's arrest in Haryana for spying for Pakistan, 10 more people across three states have been detained. This is the biggest crackdown since the Pahalgam attack.

दिल्ली – पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून हरियाणाच्या ज्योती मल्होत्राला (Jyoti Malhotra) अटक करण्यात आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, आतापर्यंत एकूण ११ लोकांना अटक करण्यात आली आहे. हे अटकसत्र हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे.

ज्योती मल्होत्रा ही युट्यूबर असून तिच्या चॅनलला 3.85 लाख सब्सक्राइबर आहेत. तिने मागील तीन वर्षात पाकिस्तान दौरे केले होते. ती पाकिस्तानी उच्चआयोगातील ‘दानिश’ नावाच्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, तिला हेर म्हणून तयार केले जात होते.

After Jyoti Malhotra’s 10 more people arrested 

गजाला आणि यामीन मोहम्मद (पंजाब), देवेंद्र सिंह (पंजाब), अरमान (हरियाणा), नौमान इलाही (उत्तर प्रदेश), मोहम्मद मुर्तजा अली (पंजाब), शहजाद (उत्तर प्रदेश), सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंग (पंजाब) – यांच्यावर पाकिस्तानसाठी माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

अटक करण्यात आलेले बहुतेक तरुण 20-30 वयोगटातील आहेत. काही आरोपींनी भारतीय लष्कराच्या छावण्यांचे फोटो, व्हिडिओ पाठवले होते. काहींना पैशांच्या मोबदल्यात माहिती देण्याचे काम दिले गेले होते. ऑपरेशन सिंदूरसंबंधित माहिती लीक करण्यात आली होती.

पहलगाम हल्ल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असून, पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या हेरगिरीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install