🕒 1 min read
Kolhapur News | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे काही नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांना विचारले असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी थेट “मला हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही” असे म्हणत हा विषय ‘चिल्लर’ असल्याचे सूचित केले. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत असंतोषाची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
Satej Patil Kolhapur Congress Defection
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले, “शरद पवार हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते असून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकत्र येतील, याला तथ्य नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र काम करत राहतील.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही सतेज पाटलांनी भूमिका मांडली. मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानावर उत्तर देताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाकडे बोट दाखवत सांगितले की, “कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सध्याच्या परिस्थितीतच निवडणुका घ्या.” त्यामुळे निवडणुका लवकरच होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत साशंकता व्यक्त करत, सतेज पाटलांनी राज्य सरकारकडे सर्व पक्षांच्या चर्चेसाठी बैठक बोलावण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने निवडणुकांचे स्वरूप आणि प्रक्रिया स्पष्ट करावी,” अशी विनंती त्यांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काँग्रेस पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारताची भूमिका ठाम: युद्धविराम होऊनही सिंधू जल करार तात्पुरता स्थगित
- युद्धविरामाआधी चीनचा हस्तक्षेप; परराष्ट्र मंत्री वांग यी यांचा भारत आणि पाकशी संपर्क
- पाकिस्तान नव्हे, भारतच मागे हटला? युद्धविरामासाठी अमेरिकेशी संपर्क — CNN चा दावा मोदी सरकारसाठी डोकेदुखी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












