Share

Devendra Fadnavis यांच्याविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार, नेमकं कारण काय?

Devendra Fadnavis यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून ते हक्कभंग आणणार आहे. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू शकते.

by MHD

Published On: 

Congress will bring disenfranchisement against Devendra Fadnavis in Somnath Suryavanshi death case

Devendra Fadnavis । राज्याचे राजकारण मागील काही वर्षांपासून बिघडत चालले आहे. विविध कारणांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. यावरून अनेकदा राजकीय वातावरण देखील तापत असते. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे.

“सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) या तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालाने केली असताना राज्य सरकार अजूनही या प्रकरणाशी संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला असल्याची खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनामध्ये देत सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

सरकार याच प्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करत असले तरी सरकारने संबंधितांना बडतर्फ करावे. सभागृहाला दिशाभूल केल्याने त्यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणणार आहोत,” अशी घोषणा नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

Nana Patole on Devendra Fadnavis

पुढे ते म्हणाले की, “सुरेश धस (Suresh Dhas) यांनी परभणी प्रकरणातील पोलिसांना माफ करण्याची भाषा केली. त्यांचा हा दुटप्पीपणा आहे. तो फक्त सुरेश धस यांचा नसून सरकारचा दुटप्पीपणा आहे. सरकार सुरेश धसांना बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही