Share

Ayodhya Ram Temple | रामलल्लाचा पहिला फोटो, मंदिराच्या गर्भगृहातून झलक

First Photo Of Ram Lalla At Ayodhya Ram Temple Marathi News

Published On: 

🕒 1 min read

Ayodhya Ram Temple | रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आली. मुख्य राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १६ जानेवारीपासून विधी सुरु झाली आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात ( Ayodhya Ram Temple ) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात गुरुवारी रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली.

चार तास ही पूजाविधी चालली. या रामलल्लाच्या मूर्तीची ( Ayodhya Ram Temple ) पहिली झलक प्रथमच समोर आली. गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत बालकरुपातील रामलल्ला दिसत आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती बनवली आहे. मूर्ती आता झाकून ठेवलेली आहे.

First Photo Of Ram Lalla At Ayodhya Ram Temple

गुरुवार रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले. यावेळी विविध प्रकारचे संस्कार आणि पूजन करण्यात आले. प्राणप्रतिष्ठेसाठी काशीवरुन आलेल्या पुरोहितांनी विधी विधान केले.

रामलल्लाचे आसन 3.4 फूट उंच आहे. क्रेनच्या मदतीने रामलल्लाची मूर्ती राम मंदिर ( Ayodhya Ram Temple ) परिसरात आणली गेली. आता 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!