🕒 1 min read
Manoj Jarange | सांगली: उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरताना दिसलं.
राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.
याच पार्श्वभूमीवर काल जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर खोचक टीका केली आहे.
तर जरांगे ( Manoj Jarange ) यांनी देखील भुजबळांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे राज्यात दौरे करत आहे.
We should be given reservation – Manoj Jarange
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सांगली, विटा आणि इस्लामपूर या ठिकाणी भव्य सभा पार पडल्या.
यावेळी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “ओबीसी समाजातील बहुतेक जाती शेती व्यवसाय करतात. त्याचबरोबर मराठा समाजही शेती करतो. या पार्श्वभूमीवर आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे.
आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? न्यायालयाकडून आम्हाला डावरलं का जात आहे? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.”
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करू नका, असं आवाहन मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मराठा समाजाला केलं होतं.
त्यानंतर देखील मराठा तरुण आपला जीव देताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एका 9 वीत शिकणाऱ्या तरुणीने मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे. कोमल तुकाराम बोकारे, असं या तरुणीचं नाव आहे.
आई-बाबा मला माफ करा. मराठा समाजाला लवकर आरक्षण द्या, माझं बलिदान व्यर्थ जाऊ नका, असं तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; मराठा आरक्षणासाठी 9 मध्ये शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
- Manoj Jarange | मनोज जरांगेंचा बॅनर फाडल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल; FIR मध्ये भुजबळांचं नाव
- Raj Thackeray | जातीपातीच्या चिखलातून बाहेर या; भुजबळ-जरांगे वादात राज ठाकरेंची उडी
- Uddhav Thackeray | कमळाबाईच्या ओटीत शिरलेले ‘शिवसैनिक’ कसे? ठाकरे गटाचा खोचक सवाल
- Coriander Benefits | बदलत्या वातावरणात कोथिंबीरीचे सेवन केल्याने मिळतात अनेक आरोग्यदायी फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











