Share

Sanjay Shirsat | शरद पवारांनी टाकलेली गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली; संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत युती करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो. मात्र, ते माझ्या नीतिमत्तेत बसत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस … Read more

Published On: 

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत युती करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो. मात्र, ते माझ्या नीतिमत्तेत बसत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करणं हे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार होते का? असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

During the elections, Uddhav Thackeray was criticizing Congress and NCP – Sanjay Shirsat

संजय शिरसाट म्हणाले, “भाजपसोबत जाणं हे माझ्या नीतिमत्तेत बसत नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणं आहे त्यांचे विचार होते का?

ही त्यांची नीतिमत्ता होती का? निवडणुकांच्या वेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चोर आणि दरोडेखोर म्हणत टीका केली. त्याच दरोडेखोर आणि चोरांबरोबर जाणं त्यांची नीतिमत्ता आहे का?

आज त्यांचा पक्ष कुठं आहे? त्यांनी एकदा बघावं. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस कुठं आहे? हे देखील त्यांनी पाहावं. शरद पवारांनी टाकलेली गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली आहे.

उद्धव ठाकरेंनी आमचं म्हणणं ऐकावं, यासाठी आम्ही त्यांच्या दरवाजाच्या बाहेर उभे होतो. मात्र, त्यावेळी ते बाहेर यायलाच तयार नव्हते. त्यांनी स्वतःला डांबून ठेवलं होतं. तेव्हा त्यांनी आमचं ऐकलं असतं तर कदाचित त्यांच्यावर आज ही वेळ नसती.”

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) खूप वेळ घेतं असल्याचं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे गटाला प्रत्येक चुकीचा परिणाम भोगावा लागणार आहे. आम्ही त्यांना कायद्याला धरून उत्तर दिलं आहे.

विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायला वेळ लागत आहे. कारण ती एक कायदेशीर बाब आहे. मात्र, त्या लोकांना हे कळत नाही. म्हणून आज त्यांच्या पक्षाची ही गत झाली आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही