Share

Sanjay Shirsat | “… म्हणून अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत नाही”; संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. या प्रकरणावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निधी वाटप करत असताना अजित पवारांनी सर्व आमदारांना समान निधी दिला असल्याचं संजय शिरसाट … Read more

Published On: 

Sanjay Shirsat | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

या प्रकरणावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निधी वाटप करत असताना अजित पवारांनी सर्व आमदारांना समान निधी दिला असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Our side is strong – Sanjay Shirsat

माध्यमांशी संवाद साधत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “मंत्री अनिल पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते जे काही वक्तव्य करत आहे त्यामुळे अजित पवार अडचणीत सापडतील.

पण ते मुख्यमंत्री बनू शकत नाही. परंतु या सर्वांमुळे अजित पवारांच्या अडचणींमध्ये नक्की वाढ होणार आहे. ज्यांची बाजू कमकुवत असते त्यांच्या मनात भीती असते.

आमची बाजू मजबूत आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही. त्याचबरोबर आम्ही वकिलांमार्फत सर्व काही विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. यावरून विधानसभा अध्यक्ष जो काही निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, आमची बाजू मजबूत आहे.

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “अर्थमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच सर्वांना निधी वाटप केलं. निधी वाटपावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधकांना वाटतं आमच्यावर अन्याय झाला. मात्र, तसं काही झालेलं नसून अजित पवारांनी योग्य निधी वाटप केलं आहे. अजित पवारांना उगाच बदनाम केलं जात आहे. पवारांनी सर्वांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच निधी वाटप केला आहे.”

“जे पक्ष सत्तेत असतात त्यांना अधिक निधी दिला जातो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हेच घडलं आहे. त्यामुळे निधी वाटपावरून आमच्यात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. कारण सर्वांना सारखा निधी दिला आहे, हे मी आवर्जून सांगतो”, असही ते (Sanjay Shirsat) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही