Share

Eknath Shinde Shivsena | ‘या’ दिवशी ठरणार ‘धनुष्यबाण’ कोणाचा?; आता द्यावं लागणार लेखी उत्तर!

🕒 1 min readShivsena | नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा त्याचबरोबर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचं? या मुद्द्यावरुन जवळपास साडेतीन तासांपासून निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Shivsena | नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा त्याचबरोबर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचं? या मुद्द्यावरुन जवळपास साडेतीन तासांपासून निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा संभ्रम कायम आहे. सोमवारी 30 जानेवारी रोजी याबाबत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. त्याबरोबर 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची हा पेच आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!