Weather Update | देशात वाढणार उन्हाचा चटका, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा चटका (Summer heat) वाढत चालला आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेतीसह मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. देशातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), या आठवड्यामध्ये देशातील बहुतांश भागात हवामान स्वच्छ राहील. तर 13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस असला तरी तापमानात घट होणार नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर आज राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा 42 ते 44 अंश नोंदवला जाऊ शकतो.

विदर्भातील बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका वाढत चालला आहे. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्यामध्ये 5 ते 7 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता (Weather Update) आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विदर्भामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. मात्र, विदर्भात आता खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, देशात यावर्षी एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत तो 109 टक्के अधिक होता. उत्तर भारत आणि दिल्लीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा होता. अशात आगामी काळामध्ये पाऊस ओसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) दिली आहे.

महत्वाच्या बातम्या