Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाठ म्हणाले,”राज्यातील सत्ता संघर्षवरील निकाल येत्या दोन-तीन दिवसात लागण्याची शक्यता आहे. हा निकाल आमच्या विरोधात लागेल आणि आमचे सरकार पडेल, असं अनेकांना वाटत आहे. मात्र, असं काहीही होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही सत्ता आमचीच राहणार आहे.”

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडेल आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल या चर्चेबाबत विचारलं असताना संजय शिरसाठ म्हणाले, “महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा जो वाद निर्माण झाला आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार आहे. मात्र, याचा अर्थ हा निकाल आमच्या विरोधात लागेल, असा नाही. आमचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि आमची सत्ता संपेल याबाबत काही लोकांना उत्सुकता लागली आहे. मात्र, असं काहीही घडणार नाही आम्ही सत्तेत कायम राहणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या