IPL 2023 | सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू आयपीएल हंगामातून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे.

जोफ्रा आर्चर आयपीएलच्या (IPL 2023) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. मुंबईला पुढील सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजाच्या कमतरतेचा सामना करावा लागणार आहे. आर्चर ऐवजी मुंबईने ख्रिस जॉर्डनच्या संघात समावेश केला आहे.

आयपीएल 2023 (IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सने आर्चरला तब्बल 8 कोटी रुपयांनी आपल्या संघात सामील केले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडावे लागत आहे. या हंगामात तो फक्त पाच सामने खेळू शकला आहे.

आर्चरला पुनर्वसनासाठी इंग्लंडला रवाना करण्यात आले आहे. मुंबईने आतापर्यंत 10 सामने खेळले आहे. मुंबईमध्ये आर्चरच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनचा समावेश करण्यात आला आहे. आर्चरने मुंबई इंडियन्स कडून 5 सामन्यांमध्ये 2 विकेट घेतल्या आहेत. त्याने 9.50 च्या इकॉनोमीसह धावा दिल्या आहेत. तर दुसरीकडे जॉर्डनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 28 सामने खेळलेले असून त्याने यामध्ये 27 विकेट घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.