Sanjay Raut | संजय राऊत कुठं गेले? शरद पवारांवरील टीकेनंतर राऊत बॅकफूटवर

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत वेगवेगळ्या गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतात. राऊत गेले दोन दिवस झाले माध्यमांपासून दूर आहे. संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत गायब आहे. राऊत माध्यमांसमोर आले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत गेले कुठं? असा सवाल उपस्थित झाला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शरद पवार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे’, अशी खोचक टीका त्यांनी या अग्रलेखाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.

प्रत्येक आरोपाला, टीकेला प्रत्युत्तर देणारे संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांसमोर गेल्या दोन दिवसांपासून दिसले नाही. संजय राऊत कुठं गेले? ते नॉट रिचेबल आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. पवार वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया देत पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मला राजीनामा मागे घ्यावा लागला. आम्ही पक्षात काय करतोय याबद्दल राऊतांना माहिती नाही. आम्ही कुणाला संधी दिली आणि आम्ही काय केलं हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो.”

महत्वाच्या बातम्या