Sharad Pawar | राष्ट्रवादी पक्षातील संजय राऊतांना काय माहित? शरद पवारांनी राऊतांना डिवचलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. अशात शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपला टीका करू द्या, आम्ही काम करू असं, शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या राजीनाम्याला भाजपने नौटंकी असं म्हटलं होतं. या प्रतिक्रियेवर उत्तर देत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भाजपला टीका करू द्या, आम्ही काम करतो. आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करू.”

नागपूरवरून जो संदेश येईल तो शिंदेंना मानावा लागतो असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सत्ता मिळाली नाही किंवा लोकांनी नाकारले, तर सत्ता आणि संपत्तीचा वापर करून लोक फोडायचे नसतात सत्ता कमवायची असते, असं देखील ते यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया देत पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मला राजीनामा मागे घ्यावा लागला. आम्ही पक्षात काय करतोय याबद्दल राऊतांना माहिती नाही. आम्ही कुणाला संधी दिली आणि आम्ही काय केलं हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो.”

सामना अग्रलेखात नक्की काय म्हटलं आहे? (What exactly does the samana agralekh say?)

शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी हादरली होती. कारण पवारांनंतर आपले कसे होणार? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना निर्माण झाला होता. पवारांनंतर राष्ट्रवादी सांभाळायला कुणीही वारस नाही. त्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि पवारांनी राजीनामा मागे घ्यावा लागला. राजकारणामध्ये शरद पवारांच्या शब्दाला मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाही, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button