Nana Patole | राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आमचे उमेदवार परत करावे, नाना पटोले यांनी केली मागणी

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये महाविकास आघाडी मजबूत असल्याचे नेहमी सांगण्यात येते. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमचे घेतलेले आमदार परत करावे, अशी मागणी केली आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसने अनेक नेत्यांना पक्षात घेतले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील ठाकरे गटात महाडमधील स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिली  आहे. या सर्व गोष्टी आघाडीसाठी योग्य नसल्याची भूमिका मांडत नाना पटोले यांनी आमचे आमदार परत द्यावे, अशी मागणी केली आहे.

आज नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्याशी बंद खोलीमध्ये चर्चा केली. याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले,”भालके नाना आणि आमचे पारिवारिक संबंध आहे. त्यामुळे आमची भेट होणं साहजिक आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी काँग्रेस पक्ष नेहमीच खंबीरपणे उभा राहणार आहे. आम्ही त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही.”

राज्यामध्ये येत्या आठवड्यात राजकीय घडामोडींचा वेग वाढणार आहे, असे पटोले यांनी सांगितलं आहे. सरकारकडे बहुमत असलं तरी मुख्यमंत्री अपात्र ठरल्यावर सरकार कोसळणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या 25व्या कार्यक्रमाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमन उधळली. पवारांबद्दल बोलत असताना शहाजीबापू पाटील भावुक झाले. मी आज पवार साहेबांना तब्बल दहा वर्षांनी भेटत आहे, असे सांगत आमदार शहाजीबापू पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.