Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसमध्ये स्थान काय? शरद पवारांनी चव्हाणांना सुनावलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा प्लॅन बी सुरू आहे, असं विधान पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं होतं. यावरून शरद पवार यांनी खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपचा प्लॅन बी सुरू आहे”, असा दावा त्यांनी केला होता.

यावर उत्तर देत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “काही लोकांची मत पक्की असतात. आपण ज्यांचं नाव घेतलं आहे, त्या गृहस्थांची मतं पक्की असतात. राष्ट्रवादीबाबत प्रश्न विचारण्यात आला की ते प्रतिकूल मत देतात. त्यामुळे आम्ही कधी गांभीर्याने त्याची नोंद घेत नाही. चव्हाणांची त्यांच्या पक्षात काय जागा आहे? त्यांनी आधी ते बघावं. ते ए आहेत की बी त्यांनी आधी ते तपासावं. त्यांच्या पक्षातल्या लोकांना विचारलं की यांची कॅटेगिरी कोणती? तर ते तुम्हाला खाजगीत सांगतील, जाहीर सांगणार नाही.”

भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य करावाच लागतो, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. आम्ही काम करतो, भाजपला टीका करू द्या आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा विस्तार करू, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.