Weather Update | जून महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार दिलासा? पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: हवामान विभागाने नवीन अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये भारतात सर्वसाधारण अर्थात सरासरी इतका पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, यावर्षी पाऊस जून महिन्यात शेतकऱ्यांना निराश करू शकतो. देशातील बहुतांश भागांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Farmers will get relief in the month of June?

वायव्य भारत, अतिउत्तर भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही भागात जूनमध्ये सर्वसामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. महाराष्ट्रामध्ये  जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे.

साधारतः नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून असते. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार आहे. केरळमध्ये चार जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात नवीन अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 96 टक्के संपूर्ण देशात मान्सून कोसळण्याची शक्यता आहे. तर जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त (Weather Update) केला आहे.

महत्वाच्या बातम्या