GT vs MI | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) अंतिम टप्प्यात आली आहे. आज आयपीएलचा क्वालिफायर 2 सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
If GT vs MI match is called off due to rain, who will go to the final?
या सामन्यामध्ये विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यामध्ये होणाऱ्या सामान्यादरम्यान पाऊस आला किंवा सामना रद्द झाल्यास गुजरातला फायदा होणार आहे. कारण पॉईंट्स टेबलवर गुजरात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास गुजरात अंतिम सामन्यात पोहोचेल.
आज होणाऱ्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला भिडेल. पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये गुजरात टायटन्स संघाला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्स अंतिम सामन्यात पोहोचली आहे.
GT vs MI Possible Playing 11
GT : शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर/दासुन शनाका, मोहित शर्मा, राशिद खान, नूर अहमद, विजय शंकर, मोहम्मद शमी.
MI : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), आकाश मधवाल, सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, नेहल वढेरा, तिलक वर्मा, पियुष चावला,ख्रिस जॉर्डन.
महत्वाच्या बातम्या
- Monsoon Update | देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या
- Sanjay Shirsat | “नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाही, मात्र संजय राऊतांना…”; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
- Kangana Ranaut | कंगना रनौतने शॉर्ट्स घालून मंदिरात गेलेल्या मुलीचे चांगलेचं कान टोचले ; म्हणाली…
- New Parliament House | नवीन संसद भवनाचं उद्घाटन मोदीच करणार, सुप्रीम कोर्टानं फेटाळली ‘ही’ याचिका