New Parliament House | नवीन संसद भवनाचं उद्घाटन मोदीच करणार, सुप्रीम कोर्टानं फेटाळली ‘ही’ याचिका

New Parliament House | नवी दिल्ली: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार आहे.

या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि पी. एस. नरसिंम्हा यांच्या सुट्टीतील खंडपीठांसमोर होणार होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेची दखलही घेतली नाही. सी.आर. जयसुकिन नावाच्या वकिलाने या याचिकेची दखल घेतली आहे.

Narendra Modi will inaugurate the New Parliament House

दरम्यान, नवीन संसद भवनाचं (New Parliament House) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रपतींनी या संसद भवनाचे उद्घाटन करावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर हे उद्घाटन नरेंद्र मोदी करत असल्यामुळे या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन संसद भवनाच्या (New Parliament House) उद्घाटनानिमित्त 75 रुपयाचं नाणं (75 Rupees Coin) जारी केलं जाणार आहे. या नाण्याचा आकार गोलाकार असून त्याचा व्यास 44 मिमी असेल. त्याचबरोबर हे नाणं चार धातूंच्या मिश्रणापासून बनवलेलं असेल. यामध्ये चांदी, तांबे, निकेल आणि झिंक या धातूंचा समावेश आहे. या नाण्याचं वजन साधारण 35 ग्रॅम असेल.

महत्वाच्या बातम्या

Back to top button