SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

SSC Result | टीम महाराष्ट्र देशा: काल (25 मे) बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक लागला तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला. दुपारी 2 वाजता हा रिझल्ट ऑनलाइन जारी करण्यात आला होता. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आता 10 वी च्या निकालाची वाट बघत आहे. दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

When and how to check SSC Result

02 मार्च ते 25 मार्च 2023 दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीकक्षेनंतर विद्यार्थी निकालाची (SSC Result) प्रतीक्षा करत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी हा निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन बघू शकतात.

वेबसाईटसह तुम्हाला SMS द्वारे देखील निकाल (SSC Result) बघता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला खालील पद्धती फॉलो करावे लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला फोनमधील मेसेजिंग ॲप ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला त्यामध्ये खालील मेसेज टाईप करावा लागेल.
  • प्रकार: MHSS (स्पेस) रोल नंबर.
  • तुम्हाला हा मेसेज 57766 नंबरवर पाठवावा लागेल.
  • काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएससीचा रिझल्ट (SSC Result) मिळेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.