Kangana Ranaut | कंगना रनौतने शॉर्ट्स घालून मंदिरात गेलेल्या मुलीचे चांगलेचं कान टोचले ; म्हणाली…

Kangana Ranaut | मुंबई : पंगाक्वीन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या वक्त्याव्यामुळे कायम चर्चेत असते. राजकारणावर तसेच देशाच्या अनेक विषयांवर ती थेट वक्तव्य करताना पाहायला मिळते. काही वक्त्याव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. तर आता कंगनाने (Kangana Ranaut) आपल्या ट्विटर अकाउंटवरून शॉर्ट घालून मंदिरात गेलेल्या एका मुलीचा फोटो रिट्विट (Retweet) केला आहे. तर ट्विट (Kangana Ranaut Tweet) करत तिने त्या मुलीला चांगलंच सुनावलं आहे.

अशा मुर्खांसाठी कडक नियम असायला हवेत-

कंगनाने (Kangana Ranaut) ट्वीट करत म्हटलं आहे की, “या मुलीने वेस्टर्न कपडे घालून मंदिरात प्रवेश केला आहे. तिने पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं आहे. एकदा मी व्हॅटिकनमध्ये होते आणि मी शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातलं होतं. त्यावेळी मला कॅम्पसमध्येही प्रवेश दिला नव्हता. तर आता शॉर्ट्समध्ये मंदिरात प्रवेश करणारी ही आळशी आणि मूर्ख मुलगी आहे. अशा मुर्खांसाठी कडक नियम असायला हवेत”. असं तिने ट्विटमध्ये म्हटल आहे.

Kangana Ranaut Tweet –

दरम्यान, जो फोटो कंगनाने (Kangana Ranaut) रीट्विट केला आहे. त्या यूजरने देखील फोटो ट्विट करत लिहलं आहे की, हा फोटो हिमाचलमधील लोकप्रिय शिव मंदिर बैजनाथ मंदिरातील आहे. एखाद्या पब किंवा नाईट क्लबमध्ये गेल्याप्रमाणे या मंदिरात ही मुलगी जात आहे. याला माझा तीव्र विरोध आहे. हा फोटो पाहून मला वाटतय की अजूनही तिची विचारसरणी पुढारलेली नाही असं म्हणेल. असं त्याने सुरुवातीला फोटो ट्विट करत म्हटलं आहे. त्याचंच हे ट्विट कंगनाने (Kangana Ranaut) रीट्विट करत आपल्या शब्दात त्या मुलीची कान टोचले आहे. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यावर अनेक कंमेंट देखील येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-